हे भोळ्या शंकरा
He Bholya Shankara
आरती संग्रह
Loading…
Jai Jai Tryambakraj
Also known as: जय जय त्र्यंबकराज, श्री त्र्यंबकेश्वराची आरती, Shankarachi Aarti, Tryambakeshwar Aarti
Source: Gosavinandan / Traditional Trimbakeshwar Aarti
Jai Jai Tryambakraj
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो || धृ ||
पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥
प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ १ ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो || धृ ||
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो ।
आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥
तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ २ ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो || धृ ||
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ ३ ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो || धृ ||
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ ४ ॥
Read with purity of heart and devotion 🙏
More Shiva Aartis →