शिर्डी माझे पंढरपूर
Shirdi Mazhe Pandharpur
शिर्डी माझे पंढरपुर ।
Namaskar Sashtang Shri Sainatha
Also known as: अनंता तुला ते कसे रे स्तवावे, Ananta Tula Te Kase Re Stavave, Sai Sashtang Namaskar Ashtak, Shirdi Sai Ashtak
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान १४-१५)
अनंता तुला ते कसे रे स्तवावे ।
अनंता तुला ते कसे रे नमावे ।।
अनंत मुखांचा शिणे शेष गाथा ।
नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ।। १ ।।
स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे ।
उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे ।।
तरावे जगा तारुनी मायताता ।
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। २ ।।
वसे जो सदा दावया संत लीला ।
दिसे अज्ञ लोकापरी जो जनाला ।।
परी अंतरि ज्ञान कैवल्यदाता ।
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। ३ ।।
बरा लाधला जन्म हां मानवाचा ।
नरा सार्थका साधनीभूत साचा ।।
धरु साईप्रेमा गळाया अहंता ।
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। ४ ।।
धरावे करी सान अल्पज्ञ बाला ।
करावे आम्हा धन्य चुंबोनि घाला ।।
मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता ।
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। ५ ।।
सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताति ।
सुरादिक ज्यांचे समानत्व देती ।।
प्रयगादि तीर्थेपदि नम्र होता ।
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। ६ ।।
तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली ।
सदा रंगली चित्स्वरुपि मिळाली ।।
करी रासक्रीड़ा सवे कृष्णनाथा ।
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। ७ ।।
तुला मागतो मागणे एक द्यावे ।
करा जोडितो दिन अत्यंत भावे ।।
भवि मोहनीराज हा तारी आता ।
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। ८ ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Sai Baba Aartis →