सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
Sada Sarvada Yoga Tujha Ghadava (Prarthana & Shlokas)
Also known as: आरती समाप्ती प्रार्थना, Prarthana, Sada Sarvada Yog Tujha Ghadava, Ghalin Lotangan Prarthana
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान १७)
सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षू नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हे चि आतां ।
जय जय रघुवीर समर्थ ।
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ।
मोरया मोरया मी बाळ तान्हें ।
तुझी सेवा करू काय जाणे ।
अन्याय माझे कोट्या नु कोटी ।
मोरेश्वरा बाळ तूं घाल पोटी ।
कैलास राणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।।
कारुण्य सिंधू भव दुःख हारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ।
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र ।
तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र ।
तया आठविता महापुण्यराशी।
नमस्कार माझा सदगुरु गयानेश्वराशी ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Ganesh Aartis →