जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
Jaydev Jaydev Shri Swami Samartha
Also known as: श्री स्वामी समर्थांची आरती, Swami Samarth Aarti, Jaydev Jaydev Swami Samartha, Akkalkot Maharaj Aarti
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान १०)
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ।।
जयदेव जयदेव ।।
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगदुध्दरासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ।। १ ।।
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ।। ०२ ।।
देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया ।। ०३ ।।
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ।। ०४ ।।
English Meaning & Significance
Read with purity of heart and devotion 🙏
More Swami Samarth Aartis →