आरती ज्ञानराजा (महाकैवल्यतेजा)
Aarti Dnyanraja (Mahakaivalyateja)
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्यतेजा ।।
Yei Ho Vitthale Mazhe Mauli Ye
Also known as: येई हो विठ्ठले, Yei Ho Vitthale, Vitthal Alavni, Nidhalavari Kar Thevuni
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०७)
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ओ देवा, वाट मी पाहें...
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ०१ ।।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ०२ ।।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि...
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ०३ ।।
विठोबाचें राज्य आम्हा दसरा दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ०४ ।।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें...
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ।।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ०५ ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Vitthal Aartis →आरती ज्ञानराजा (महाकैवल्यतेजा)
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्यतेजा ।।
युगे अठ्ठावीस (आरती पांडुरंगाची)
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
ओवाळू आरती माझ्या विठ्ठलाची
ओवाळू आरती माझ्या विठ्ठलाची ।