येई हो विठ्ठले माझे माउली ये
Yei Ho Vitthale Mazhe Mauli Ye
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
Yuge Atthavis (Aarti Pandurangachi)
Also known as: आरती विठ्ठलाची, Aarti Vitthalachi, Yuge Atthavis Vitevari Ubha, Panduranga Aarti
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०५-०६)
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणीं वाहे भीमा उध्दरी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा, पावे जिवलगा ।
जय देव जय देव ।। धृ ।।
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटी ।
कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ।। २ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । हो हरी पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा ।
जय देव जय देव ।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णांची कमळें वनमाळा गळां ।।
राही रखुमा बाई राणिया सकळा ।
ओवाळीती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
हो हरी पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा ।
जय देव जय देव ।
ओवाळूं आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमध्ये सोडुनियां देती ।।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा दहारिया महिमा,
वर्णावा किती ।। ४ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । हो हरी पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा ।
जय देव जय देव ।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
हो साधुजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवां श्री नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । हो हरी पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा ।
जय देव जय देव ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Vitthal Aartis →येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आरती ज्ञानराजा (महाकैवल्यतेजा)
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्यतेजा ।।
ओवाळू आरती माझ्या विठ्ठलाची
ओवाळू आरती माझ्या विठ्ठलाची ।